#Chandrapur #shivsena
• चंद्रपुरात महिला शक्तीचा महास्फोट; शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हाकेला उस्फूर्त प्रतिसाद
सुवर्ण भारत: किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : शहरात आज दि.२२ मार्च रोजी म
हानगर पालिका प्रांगणात संध्याकाळी ०७.०० वाजता महिला सक्षमीकरणाचा भव्य आणि प्रेरणादायी सोहळा रंगला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ‘महिला सक्षमीकरण मेळावा’ने चंद्रपुरात महिला शक्तीचा जागर घडवून आणला. कार्यक्रमाला शहरासह ग्रामीण भागातूनही महिलांची विक्रमी उपस्थिती लाभली.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षा मनस्वी संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. सुबक मांडणी, शिस्तबद्ध आयोजन आणि उत्साही वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना सुषमा अंधारे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा ठोस मुद्दा मांडला. “आजची महिला सक्षम, जागरूक आणि निर्णायक भूमिका घेणारी आहे. आता केवळ घरापुरती मर्यादा न ठेवता समाजकारण, राजकारण आणि नेतृत्वाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे यावे,” असे प्रभावी आवाहन त्यांनी केले. त्यांच्या भाषणाने उपस्थित महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
या मेळाव्याला महिला संपर्क प्रमुख सुषमा साबळे, महिला जिल्हाप्रमुख कल्पना गोरघाटे, नगरसेविका श्रुती घटे, वेता लांडगे, किरण कोत्तापल्लीवार, रंजनी मुलचंदानी, रंजिता बिरे,काजल तोटावार यांच्यासह उपमहापौर प्रशांत दानव, शिवसेना गटनेता राहुल वीरूटकर, नगरसेवक आकाश साखरकर, माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे, उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,घनश्याम मुलचंदानी, बबनभाऊ उरकुडे, महानगरप्रमुख सुरेश पचारे, विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक संदीप गिऱ्हे व मनस्वी गिऱ्हे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
या मेळाव्याच्या माध्यमातून चंद्रपुरात महिला सक्षमीकरणाचा ठाम संदेश देत महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.





