रोटरी क्लब वरोरा तर्फे पानपोई व गरजूना सूती दुपट्टा चप्पल वितरण केंद्राचे उद्घाटन
सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर ( वरोरा तालुका प्रतिनिधी)
वरोरा : रोटरी क्लब वरोरा यांच्या वतीने पानपोई तसेच
गरजू व गरीब नागरिकांसाठी सूती दुपट्टा व चप्पल वाटप केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
हा कार्यक्रम बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परिषद वरोरा यांच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार,AG अमित लाहोटी, प्रोजेक्ट हेड चेतन शर्मा, तसेच अमित नाहर, अभिजित मणियार, विशाल जाजू, अभिजित बोथले, अदनान सद्दीकोट, राम लोया, पियुष गुंडावार ,विक्की आगलावे हे मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे तसेच गरजू नागरिकांना सूती दुपट्टे व चप्पलांचे वाटप करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रोटरी क्लब वरोराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

