Home Breaking News झूलेलाल जयंतीनिमित्त बल्लारपुरमध्ये डॉ. काशीनाथ सिंह यांचा भव्य सत्कार

झूलेलाल जयंतीनिमित्त बल्लारपुरमध्ये डॉ. काशीनाथ सिंह यांचा भव्य सत्कार

211
Oplus_131072

#Ballarpur

• झूलेलाल जयंतीनिमित्त बल्लारपुरमध्ये डॉ. काशीनाथ सिंह यांचा भव्य सत्कार

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपुर : झूलेलाल जयंतीच्या पावन आणि उत्साहपूर्ण निमित्ताने बल्लारपुर शहरातील सिंधी समाजाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नुकतीच हैदराबाद येथे डॉक्टरेट पदवी प्राप्त करून शहराचा मान वाढविणारे डॉ. काशीनाथ सिंह यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ज्येष्ठ व लोकप्रिय लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते डॉ. काशीनाथ सिंह यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

समारंभाला बल्लारपुर शहरातील अनेक मान्यवर नागरिक, व्यापारी बंधू, समाजसेवक तसेच सिंधी समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उत्साह, अभिमान आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर वातावरण अनुभवायला मिळाले.

सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. काशीनाथ सिंह यांनी सिंधी समाजातील सर्व बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले. हा सन्मान आपल्या पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता समाजातील एकता, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडविणारा ठरला.