Home Breaking News Good Friday – जीवनाला दिशा देणारा दिवस*

Good Friday – जीवनाला दिशा देणारा दिवस*

11

Good Friday – जीवनाला दिशा देणारा दिवस

Good Friday हा त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस आहे. येशू ख्रिस्तांनी अन्याय सहन करूनही प्रेम आणि क्षमेचा मार्ग निवडला. त्यांचे जीवन आपल्याला दाखवते की खरे सामर्थ्य रागात नसून शांततेत असते.

या दिवसातून आपण शिकतो की, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी संयम ठेवावा. संकटातही योग्य मार्ग सोडू नये. इतरांना मदत करावी आणि मनात कटुता न ठेवता क्षमा करावी. नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा व आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे.

Good Friday आपल्याला सांगतो की, चांगले विचार, सहनशीलता आणि प्रेमानेच जीवन सुंदर बनते.

✍️प्रा .वैशाली राऊत
सहज सुचलं लेखिका नागपूर