प्रा . सुनंदा पाटील यांचा साहित्य सन्मान!
चंद्रपूर -विशेष प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार गझलनंदा उर्फ प्रा . सुनंदा पाटील यांचा दि. १८ एप्रिल २०१६ रोजी कोकण मराठी साहित्य परिषद दादरच्या वतीने आजवरच्या त्यांच्या साहित्यिक वाटचालीबद्दल सन्मानीत करण्यात आले.
सन्मानपत्र,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन हा सन्मान करण्यात आला .
कोकण मराठी साहित्य परिषद दादर शाखा मुंबई आणि अखिल भारतीय महिला परिषद सेवा भारतीय* यांच्या संयुक्त विद्यमाने ” वासंतिक संध्या साहित्य कला दर्शन आणि साहित्यिक सन्मान असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
या कार्यक्रमासाठी कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ , प्रमुख पाहुण्या गायिका आणि वनिता समाज दादरच्या विश्वस्त माधुरी गोडबोले , कार्यवाह प्रा. दीपा ठाणेकर , मुंबई जिल्हाध्यक्ष विद्या प्रभू , सेवा भारतीच्या अध्यक्ष डॉली अय्यम , विश्वस्त अपर्णा राणे , शशिकला पाटणकर उपस्थित होते .
कोमसाप दादरच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अंजना कार्णिक , कार्यवाह मनोज धुरी* आणि सर्व सदस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी केला . सन्मानार्थी ,कलावंत ,आणि रसिक प्रेक्षकांची व श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती हीच या कार्यक्रमाची यशस्विता म्हणावी लागेल .
सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे .



