Home Breaking News अल्ट्राटेक मानिकगड माईन्स जडवाहतुक आळा घाला अन्यथा आंदोलन

अल्ट्राटेक मानिकगड माईन्स जडवाहतुक आळा घाला अन्यथा आंदोलन

86

अल्ट्राटेक मानिकगड माईन्स जडवाहतुक आळा घाला अन्यथा आंदोलन

मंगेश तिखट  :  चंद्रपूर  प्रतिनिधी

अनेक विवादात बहुचर्चित अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मानिकगड ( यूनिट ) ची चुनखड्डी माईन्स कुसुंबी येथे धडाक्यात सुरू आहे नियमबाह्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचा वापर करूण नागरीकाच्या वाहतुकीस अडथळा निर्माण करूण धुळीचा प्रदूषण निर्माण झाल्याने नागरीकाना वैताग झाला आहे. या भागातील वाहतुकीस आदिवासी जिवती / राजुरा तालुक्यातील ८ -१० गावाचा संपर्क असलेल्या रस्त्यावर कंपनीने नियमबाह्य लिज करारात रस्ता सार्वजनिक राहील असे नमूद असताना त्यावर कब्जा करूण जडवाहतूक लोडर व हायवा धावत असल्याने लिंगनडोह नोकारी रस्त्यावरूण वाटसरुना कमालीचा त्रास होत आहे अनेक विवादात प्रसिद्ध असलेल्या मानीकगड यूनिट गुंतली असताना नव्याने जडवाहतूक सार्वजनिक रस्त्यावरूण तात्काळ थांबवावे व कंपनीने स्वताः पर्यायी मार्ग व्यवस्था निर्माण करावी लिंगनडोह गावालगतच्या चूनखड्डी खदाणीमध्ये तिव्र स्फोटक द्रव्य वापर मोठ्या प्रमाणात होत असत्याने गावातील अनेक घराना भेगा पडून तडे गेले आहे खदान ५oo मीटर अंतरावर असल्याने ब्लॉस्टिंग मुळे पाळीव प्राण्याचे नुकसान व दगडाचा मार सहन करावा लागत असल्याने अनेक जनावरांना दुखापत झाली आहे गावालगत खोल खदाणी 200 ,ते 300 ,मीटर खोल होऊन मोठ्या प्रमाणात पाणी साठवित पाण्याचा वापर कंपनी करीत असल्याने पंचकोशीतील आसापूर लिंगनडोह पाटागुडा बॉम्बेझरी येथे तिव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे सप्लाय बेसवर असलेल्या कामगारांचे शोषण करूण त्यांना नाममात्र रोजंदारी देऊन कामगार कल्याण धोरणाची खिल्ली उडवित शोषण केल्या जात आहे शासनाचे ,८० % ,कामगार स्थानिक असावे हे धोरण असले तरी स्थानिकाना डावलून परंप्रातीय कामगाराना संधी दिल्या जात आहे तिव्र स्फोटक द्रव्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण मुळे वण्य प्राण्याचे निवारे नष्ट झाल्याने वण्यप्राणी शेतीच्या पिकाची नासाडी व पिकाचे नुकसान करीत आहे यापुर्वी ग्रामसभेत पेसा ग्रामसभेत ठराव करूण नविन वाढीव १९० हेक्टर प्रस्ताव नामंजूर करूण अदिवासी संस्कृती व परंपरा इतिहास पुसु देणार नाही व जमीन देण्यास नकार दिला कंपनीच्या क्रेशर वाहन वाहतुक व किलींकर शायलो मुळे मोठ्या प्रमाणात धुळ प्रदूषण होत असल्याने शिवारातील पिकाला फटका बसत असताना कंपनी धुळ नियंत्रण रोकण्यास असफल ठरण्याने शेती च्या उत्पादणात घट होऊन आर्थिक कर्जबाजारी पणांचा ओझा डोक्यावर बसत आहे राखीव वनक्षेत्रात अनेक वुक्ष धुळीमुळे प्रदूषित रान ओसाळ होत आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन समस्या सोडवावी सार्वजनिक रस्त्यावरील उभारलेले गेट काढण्यात यावे अन्यथा माईन्स च्या एक नंबर गेटवर आदोलन करण्याचा इशारा संतोष राठोड श्रीराम पवार रामदास राठोड जर्नादन पवार यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.