Home Breaking News अपघातग्रस्त डोंगरे कुटुंबाला मदतीचा हात माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची...

अपघातग्रस्त डोंगरे कुटुंबाला मदतीचा हात माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची सांत्वन भेट

56

अपघातग्रस्त डोंगरे कुटुंबाला मदतीचा हात

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची सांत्वन भेट

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)


गडचिरोली : सिरोंचा
तालुक्यातील टेकडा येथे झालेल्या दुर्दैवी दुचाकी अपघातात श्री. व्यंकटी लचय्या डोंगरे यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातामुळे डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे आर्थिक व मानसिक संकट निर्माण झाले आहे.

दरम्यान, तालुका दौऱ्यावर असताना अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांना या घटनेची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळताच त्यांनी तत्काळ टेकडा येथे भेट देत डोंगरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत “आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असा विश्वास दिला. तसेच त्यांनी कुटुंबाला आर्थिक मदतही केली.

या प्रसंगी मल्लना संगर्ती, संतोष पडाला, शंकर नरहरी, मधुकर नीलम, तिरुपती जंगा, राजेशम काशेट्टी, राजबापू पोलमपल्ली, श्रीनिवास ओल्लाला, शंकर कवरे, स्वप्नील पेद्दी तसेच स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मदतीमुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, गरजू कुटुंबाला वेळेवर मिळालेल्या आधारामुळे सहानुभूतीची भावना व्यक्त होत आहे.