Home Breaking News विसापूरच्या विद्यार्थ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू दहावीची परीक्षा केली होती उत्तीर्ण : आजोबांना...

विसापूरच्या विद्यार्थ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू दहावीची परीक्षा केली होती उत्तीर्ण : आजोबांना हातभार लावण्यासाठी कर्टरच्या होता कामाला

226

विसापूरच्या विद्यार्थ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
दहावीची परीक्षा केली होती उत्तीर्ण : आजोबांना हातभार लावण्यासाठी कर्टरच्या होता कामाला

सुवर्ण भारत वैभव मेश्राम (बल्लारपूर,प्रतिनिधी)

विसापूर : लहानपणी वडिलांचे छत्र हरवले.आईने पुर्नविवाह केला. तो आजोबा कडे राहून शिक्षण घेत होता.शिक्षण घेत असताना सुट्टीत कामाला जात होता. नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात तो ५६ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाला. भावी आयुष्याचे स्वप्न पाहत होता.आंघोळ केल्यावर अंतर्वस्त्र वाळू घालत असताना त्याला विजेचा जबर धक्का बसला. यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथे आज रविवारी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. आयुष विशाल लाडे ( १६ ) असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विसापूर येथील निलकंठ वाघमारे या आजोबाकडे आयुष लहानपणापासून राहत होता.येथून त्याने शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला होता. सुट्टीच्या दिवसात मात्र मिळेल, ते काम करून शिक्षणाचे ध्येय बाळगले होते. आईवडिलांपासून पोरका झालेला आयषला मात्र आजोबाचा आधार होता. त्याने दहावीची परीक्षा दिली होती. आपण चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन भावी आयुष्यात काही तरी करावे, म्हणून धडपड करत होता.
आज सकाळी लवकर उठून आंघोळ करून कर्टरच्या कामाला जाण्याची तयारी करत होता. त्याने अंतर्वस्त्र घरी लावलेल्या तारेवर वाळत घालताना विजेचा प्रवाह त्यात आहे. हे त्याला समजले नाही. येथेच आयुष च्या आयुष्याची दोरी तुटली. एका होतकरू विद्यार्थ्यांचा अकाली मृत्यू झाला.