रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे!

चंद्रपूर विशेष प्रतिनिधी
रांगोळीच्या माध्यमातून तिने अनेक चित्रांना हुबेहूब रेखाटले आहे. अर्थात तिचं नाव आहे साक्षी वाडगूरे!
तिचं मुळ वास्तव्य नांदेड जिल्ह्यातील किनवटचं! बालपणापासून तिला चित्रकलेची अमाप आवड!
आज ती एका खासगी शाळेत कलाशिक्षिका म्हणून काम बघते. कुठलही चित्र रेखाटताना ती चित्रं सुंदर व सुरेख कसं होईल या कडे अधिक बारकाईने लक्ष पुरविते. हजारों मनोवेधक व लक्षवेधक चित्रे तिने आपल्या कलेतून उत्तम व सुरेखरित्या साकारलेली आहे.
मध्यंतरी याच साक्षीने किनवट येथे एक चित्र प्रदर्शन भरविले होते. कलारसिकांनी तिच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तिचा पाठीवर कौतुकाची थाप ठेवली होती.
एव्हढेच नाही तर तिला तिच्या कलेसाठी अनेक पुरस्कार बहाल झाले आहे. हिच साक्षी आज महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं कलाकुंजची एक सदस्य आहेत.


