Home Breaking News विसापुरात एकाच रात्री दोन घरी घरफोडी चोरांचा दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला...

विसापुरात एकाच रात्री दोन घरी घरफोडी चोरांचा दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला : चोरांच्या धुमाकूळाने नागरिकांत भीती

160

विसापुरात एकाच रात्री दोन घरी घरफोडी

चोरांचा दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला : चोरांच्या धुमाकूळाने नागरिकांत भीती

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम (बल्लारपूर, प्रतिनिधी)

विसापूर : घरी कोणी नाही. दाराला कुलूप लावून घरातील लोक बाहेर गावी गेले. ही संधी साधून चोरांनी दोन घरी घरफोडी केली.यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह ८४ हजार रुपये किंमतीचा ऐवजावर डल्ला चोरांनी मारला. ही घटना बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथे ८ मे च्या रात्री घडली. यामुळे चोरांच्या धुमाकूळाने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विसापूर येथील दशरथ तुराळे हे ८ मे रोजी मुलासह मुली कडे भद्रावती येथे गेले होते. दाराला कुलूप लावले होते. याची खातरजमा चोरांनी केली.रात्रीच्या सुमारास संधी साधून चोरांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त केले.दरम्यान तांदूळ ठेवलेला डब्बा त्यांच्या हाती लागला. त्यामध्ये चोरांना सोन्याचे दागिने व २२ हजार रूपये रक्कम मिळाली. सर्व मिळून ६२ हजार रुपये किंमतीचा ऐवजावर डल्ला मारला.

चोरांनी शेजारी असलेल्या बंडू तंवर यांच्या घराकडे मोर्चा वळवून तेथे देखील चांदीचे दागिने व घरातील १५ हजार रुपये लंपास केले. बल्लारपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील दोन घरी घरफोडी करून चोरांनी ८४ हजार आठशे रुपये किंमतीचा ऐवजावर डल्ला मारल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची तक्रार दशरथ तुराळे यांनी बल्लारपूर पोलीस ठाणे येथे दिली आहे. विशेष म्हणजे विसापूर गावात पोलीस चौकी आहे. अज्ञात चोरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत असून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.