आई “प्रभावती” ना बाद 81 !
वाढदिवसाच्या निमित्ताने आईस दिल्या अनेकांनी वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
सहज सुचलं परिवार तर्फे प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, संयोजिका रंज्जू मोडक व नलिनी आडपवार यांनी दिल्या प्रभावती आईंना शुभेच्छा व शुभकामना! 
चंद्रपूर/राजूरा किरण घाटे/सुनिल रामटेकेअवघ्या महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या व नवोदितांच्या कलागुणांना सदैव वाव व प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य आधारस्तंभ आई प्रभावती नागपूरे! ह्या आज रविवार दि.10 मे ला वयाची 80वर्ष पूर्ण करुन 81व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
🔲◼️🔲विशेष म्हणजे त्या नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप ग्रुपच्या मार्गदर्शिका ॲड.मेघा धोटे यांच्या मातोश्री होत.
आई प्रभावती ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी आपल्या शिक्षेकी सेवेत अनेकांना सुसंस्कृत केले.मुळच्या त्या औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रावती येथील मुळ रहिवाशी!
अलिकडे वयोमानानुसार त्यांची प्रकृती ठिक राहत नसल्यामुळे त्या राजूरा येथे अधिवक्ता मेघा धोटे यांच्या कडे राहत आहे.
मध्यंतरी त्या दोनदा आजारी पडल्या त्या वेळी त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात मेघा धोटे यांनी भरती केले होते.आजही त्यांची तब्येत बरी नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनाकडुन सांगण्यात आले.
त्यामुळे अधिवक्ता मेघा धोटे व मायाताई कोसरे यांनी त्यांचा वाढदिवस राजूरा मुक्कामी घरीच करण्याचे ठरविले आहे.
दरम्यान आई प्रभावती यांना सहज सुचलं कलाकुंजच्या सदस्य प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांनी एका संदेशातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
🔲💐🔲आईचं सहज सुचलंवर भरभरून प्रेम!
एकेकाळी आई प्रभावती सहज सुचलंच्या सदस्य होत्या सहज सुचलं वरील प्रत्येक पोस्ट त्या वाचून काढत.एवढ्यात त्यांच्या डोळ्यांनी अक्षर स्पष्ट दिसत नसल्यामुळे मी सहज सुचलं सोडते पण माझं सहज सुचलं वर भरभरून प्रेम आहे.असं भ्रमणध्वनी वरुन आईने बोलताना सांगितले.
आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना!
आज होवू घातलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभावती नागपूरे यांना नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे, साधना धकाते, शैला चिमड्यालवार, रंज्जू दिलीप मोडक, नलिनी आडपवार, संजीवनी धांडे,सरोज हिवरे, विजया भांगे, विजया तत्वादी, वैजयंती गहुकर, रोहिणी पराडकर, कविता दिकोंडवार, अंजली गुंडावार, सविता कोट्टी, सविता कांबळे, चंदा कामडी, अर्चना समर्थ, ज्योति घाटे,लता हिवरे, पुनम वासाडे, वनिता झाडे, अधिवक्ता कविता मोहरकर, कल्पना मांदाडे, रजनी पोयाम ,रजनी रणदिवे, सुनंदा राठोड, अपर्णा चिडे, स्मिता रेभनकर, मुग्धा गायकवाड, कविता जुमडे,मीनाक्षी गुजरकर ,स्नेहा मडावी,किरण साळवी, चैताली आतराम, पुजा पाटील ,कोकिळा पोटदुखे रश्मी हिवरे, सीमा पाटील, प्रा.राजश्री पाटील,प्रा.वैशाली राऊत , शिवानी झाडे, रश्मि पचारे, रजनी रामटेके, समता बन्सोड अर्चना चावरे, नयना झाडे, सुनंदा पाटील,आदिंनी शुभेच्छा दिल्या आहेत.


