Home Breaking News पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे स्वागत

पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे स्वागत

11
Oplus_131072

पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे स्वागत

चंद्रपूर:किरण घाटे

पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या आदेशानुसार, संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. बुधवार, १३ मे २०२६ रोजी झालेल्या या भेटीदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांचा सत्कार केला. यावेळी आयुष नोपानी यांनी संघटनेच्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेतली आणि भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे, जिल्हा कार्याध्यक्ष महेश मगरे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर वाढई, जिल्हा सरचिटणीस एकनाथ बलकी, भूषण धामदे, निळकंठ बोधे, बळीराम बोथले यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस पाल्यांच्या न्याय्य हक्कासाठी आणि समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने ही भेट महत्त्वाची ठरली.