रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम
वृद्ध व गरजू रुग्णांसाठी भव्य मोफत नेत्, दंत आणी स्त्रीरोग तपासणी शिबिर.
आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या 400 हुन अधिक लोकांनी घेतला शिबिराचा लाभ
सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर
वरोरा तालुका,प्रतिनिधी
वरोरा : समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जोपासत

‘रोटरी क्लब वरोरा’ यांच्या वतीने गरजू आणि वृद्ध व्यक्तींसाठी एक अत्यंत दिलासादायक उपक्रम घेण्यात आला.शेगाव (बुज) येथे २७ मे २०२६ ला भव्य ” मोफत नेत्र तपासणी, दंत आणी स्त्री रोग तपासणी” शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना पैशाअभावी आपला उपचार करून घेणे शक्य होत नाही.याचाच धागा पकडत रोटरी क्लब अशा नागरिकांसाठी
आपल्या समजकर्यातून एक पाऊल पुढे टाकून सहकार्याची भावना जागृत करून शिबिराचे माध्यमातून एक हात मदतीचा पुढे करीत असतात.यातूनच
गरजूंच्या सेवेसाठी रोटरीचा मुखेत्वे पुढाकार सदोदित असतो.
‘सेवा हीच आमची ओळख’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून रोटरी क्लब शिबिराचे आयोजन करीत असतात.
या पूर्वी रोटरी क्लब वरोरा तर्फे दिनांक ०७ मे रोजी चंदनखेडा इथे शिबीर घेण्यात आला होता आणी भरपूर लोकांनी त्याचा लाभ घेतला होता
आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वृद्ध आणि गरजू नागरिकांना या शिबिराचा मोठा आधार मिळाला . केवळ तपासणीच नव्हे, तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अल्प दरात चष्म्याचे वाटप करून सामान्य माणसाच्या डोळ्यांतील आणि चेहऱ्यावरील हास्य कायम राखण्याचा प्रयत्न क्लबने केला.
शिबिरातील प्रमुख सोयी-सुविधा देण्यात आल्या .
या शिबिरात नामांकित तज्ज्ञांच्या उपस्थितीत खालील सुविधा पूर्णपणे मोफत पुरवल्या गेल्या
नेत्र तपासणी :-मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी, चष्म्याचा नंबर काढणे, तिरळेपणा व काचबिंदू तपासणी आणि मोफत आय ड्रॉप्स वाटप.
दंत तपासणी :-तज्ज्ञ डॉक्टरांकडून दातांच्या समस्यांचे निदान.
आरोग्य तपासणी :- रक्तदाब (BP) आणि मधुमेह (Sugar) यांची विनामूल्य तपासणी.
विशेष म्हणजे केवळ १०० रुपयांत दर्जेदार नंबरच्या चष्म्याचे वाटप.करण्यात आले
🔴 तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा 🔴
या शिबिरात वरोरा येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निखिल अ. लांबट आणि दंत चिकित्सक डॉ. स्नेहदीप रामटेके तसेच शेगाव येथील डॉक्टर प्रणाली कामडी (झाडे )आपली सेवा प्रदान प्रदान करून 400 हुन अधिक तपासण्या पूर्ण केल्या आहेत.
शिबिर सकाळी ८:०० वाजेपासून दुपारी ०४:०० वाजेपर्यंत राबवण्यात आले.
शिबीर डॉ प्रणाली कामडी (झाडे) स्त्री रोग तज्ज्ञ यांचा दवाखाना,गजानन कॉम्प्लेक्स,मेडिकल चौक,शेगाव(बुज) येथे घेण्यात आले.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब अध्यक्ष. योगेश न.डोंगरवार , रोटेरियन अदनान सद्दीकोट,रोटेरियन अभिजित बोथले तसेच कार्यकर्ते म्हणून संजय जोगी, सुमित पाच भाई ,किशोर भोयर ,सुनील निखाडे यांनी परिश्रम घेतले
“आपले डोळे… आमची जबाबदारी” या भावनेतून आयोजित या शिबिराचा लाभ शेगाव,महालगाव,वधाळा,
खेमजाई, दादापूर, चारगाव, कोकेवाडा, सालोरी, मेसा, सोनेगाव, पळसगाव, वाघुली, निमसेडा, वनली, मानोरा, गुंजाळा, पोहा, वडधा, जुंजाळा, साखरा गाव परिसरातील जास्तीत जास्त गरजू व वृद्ध नागरिकांनी लाभ घेतला ,


