साकार नगर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 3 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त
वरोरा पोलिसांची कारवाई; सहा आरोपी ताब्यात, एक आरोपी फरार
सुवर्ण भारत |खेमचंद नेरकर
(तालुका प्रतिनिधी, वरोरा)

पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे यांच्या फिर्यादीवरून वरोरा पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली होती की, साकार नगर परिसरातील मोकळ्या जागेत काही इसम बावन्न पत्त्यांवर पैशाची हारजीत लावून जुगार खेळत आहेत. त्यानंतर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.
धाडीदरम्यान आरोपी नामे शहजाद जाफर शेख (29), सागर सुभाष वैद्य (28), कृष्णा कैलास थोरात (34), सुरज बालाजी गोहणे (27), आकाश गणेश बन्सोड (29) व कश्टी (49) यांना ताब्यात घेण्यात आले. तर एक आरोपी पोलिसांना पाहून पसार झाला.
घटनास्थळावरून बावन्न पत्ते, डावावरील 1 हजार 100 रुपयांची रोकड तसेच आरोपींकडून 3 हजार 200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय चार दुचाकी वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त वाहनांमध्ये होंडा शाईन, अॅक्टिव्हा व रॉयल एनफिल्ड बुलेटचा समावेश आहे.
सदर कारवाईत एकूण 3 लाख 74 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ)
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप मुळे, प्रशांत नागोसे, नितीन रायपुरे तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.


