Home Breaking News माढेळी-बामर्डा रोडवरील बंद ढाब्याच्या टीनाच्या शेडमध्ये शेतमजुराचा मृतदेह आढळला पत्नी व...

माढेळी-बामर्डा रोडवरील बंद ढाब्याच्या टीनाच्या शेडमध्ये शेतमजुराचा मृतदेह आढळला पत्नी व तीन मुलींचा आधार हरपला

42

माढेळी-बामर्डा रोडवरील बंद ढाब्याच्या टीनाच्या शेडमध्ये शेतमजुराचा मृतदेह आढळला

पत्नी व तीन मुलींचा आधार हरपला

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर

Oplus_131072

वरोरा तालुका, प्रतिनिधी

वरोरा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील खेकडी येथील रहिवासी किसन करनूजी नांदेकर (वय ४५) यांचा मृतदेह माढेळी-बामर्डा रोडवरील एका बंद ढाब्याच्या टीनाच्या शेडमध्ये आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
किसन नांदेकर हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार हरपल्याने खेकडी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ते कामानिमित्त परिसरात आले होते. आज सकाळी नागरिकांना ते माढेळी-बामर्डा रोडवरील बंद पडलेल्या ढाब्याच्या शेडमध्ये मृतावस्थेत आढळले. याबाबतची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा व पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक माहितीनुसार, बामर्डा येथून पायवाटेने खेकडी गावाकडे जाणारा मार्ग या परिसरातून जातो. दारूच्या नशेत शेडमध्ये झोपून राहिल्याने तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे व पाणी न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा काही नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.
मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.