ज्येष्ठ समाजसेवक मनोहरराव पंदीलवार यांचे निधन
सुवर्ण भारत : वैभव मेश्राम बल्लारपूर, प्रतिनिधी
बल्लारपूर : विसापूर येथील नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेले मनोहरराव पंदीलवार (वय ८५) यांचे रविवारी (दि. ३१ मे) दुपारी १.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
मनोहरराव पंदीलवार हे भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार यांचे वडील होत. त्यांनी सामाजिक कार्यातून नाभिक समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने विसापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार (दि. १ जून) रोजी सकाळी ११ वाजता विसापूर येथील वॉर्ड क्रमांक २, छत्रपती शिवाजी चौक येथील त्यांच्या निवासस्थानावरून निघणार असून त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.


