Home Breaking News • पराग गुंडेवार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विभागीय सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती

• पराग गुंडेवार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विभागीय सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती

51
Oplus_131072

• पराग गुंडेवार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विभागीय सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती

सुवर्ण भारत :पंकज रामटेके विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. वामनराव चटप साहेब यांच्या आदेशानुसार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते पराग गुंडेवार यांची चंद्रपूर विभागीय (चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा) सोशल मीडिया अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पराग गुंडेवार हे यापूर्वी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बल्हारशाह तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आक्रमक भूमिका बजावली आहे. संघटन विस्तार, जनजागृती आणि आंदोलनांमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

त्यांच्या नेतृत्वाखाली सोशल मीडिया माध्यमातून विदर्भ राज्याच्या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल, तसेच युवकांपर्यंत संघटनेचे विचार प्रभावीपणे पोहोचतील, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पराग गुंडेवार यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस विविध सामाजिक, राजकीय व संघटनात्मक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.