• कांचनीला जिल्हाधिकारी यांची भेट.
• जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धान्य प्रतवारी युनिटचे उद्घाटन

वरोरा : येथून जवळच असलेल्या कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनी चिनोरा येथे जिल्हाधिकारी
वसुमना पंत यांनी भेट दिली.
यावेळी धान्य प्रतवारी युनिटचे उद्घाटन करून कापूस जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीच्या उपक्रमाची पाहणी करून कांचनी एफ पी सी उपक्रमांची प्रत्येक बाब समजून घेतली.
जिल्हाधिकारी पंत यांना वृक्ष व स्मृतीचिन्ह देऊन कंपनीच्या संचालिका आशा सायरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून 500 झाडाची कंपनीच्या माध्यमातून लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांना कंपनीच्या उपक्रमा ची संपूर्ण माहिती कंपनीचे सीईओ बालाजी धोबे यांनी दिली. धान्य प्रतवारी युनिट च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीन,चना,तुर इत्यादी धान्याची प्रतवारी करण्याची सोय कांचनी येथे उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, आत्मा प्रकल्प अधिकारी कुसळकर, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरणखेडे, तालुका कृषी अधिकारी राठोड,तहसीलदार योगेश कौटकर, नायब तहसीलदार गिरीश बोर्डे,मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, गजानन पुसदेकर, कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे, संचालक बळीराम डोंगरकर, हिरालाल बघेले, नितीन टोंगे, कंपनीचे सीईओ बालाजी धोबे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज महाकुलकर, रमेश चौधरी,आशिष रोकडे, अमोल धाबेकर, साहिल साळवे, शिरीष धोबे, प्रफुल धोबे शशिकांत मडावी इत्यादीने परिश्रम घेतले.






