Home Breaking News #Chandrapur #ghugus #नकोडा • नकोडा येथे अदानी फॉउंडेशन मार्फत जागतिक पर्यावरण...

#Chandrapur #ghugus #नकोडा • नकोडा येथे अदानी फॉउंडेशन मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

72
Oplus_131072

#Chandrapur #ghugus #नकोडा

• नकोडा येथे अदानी फॉउंडेशन मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अदानी फाउंडेशन, चांदा यांच्या वतीने नकोडा गावात वृक्षारोपण चे आयोजन करण्यात आले. यावेळी स्थानिक प्रजातींची ५० रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लोकेश श्रीमाली यांनी पर्यावरण म्हणजे आपल्या भोवती असलेली निसर्गाची देणगी ज्यात हवा पाणी जमीन झाडे आणि सर्व सजीव प्राणी येतात. आपले जीवन पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहे म्हणून आपण सर्वांनी पुढे येऊन प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे व त्याचे संवर्धन केले पाहिजे.
या
कार्यक्रमाला लोकेश श्रीमाली (मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अदानी सिमेंट चांदा), आनंद कुलकर्णी (क्लस्टर HR प्रमुख), साई गौतम दीवी,CSR Head अदानी फॉउंडेशन,नकोडा ग्रामपंचायतीचे सरपंच किरण बांदूरकर , मंगेश राजगडकर उपसरपंच,प्रणय कांबळे,पोलीस पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आणि अदानी फॉउंडेशन टीम व ASDC टीम तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी उत्साहाने वृक्षारोपणात सहभाग घेतला.
पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.