Home Breaking News धनगरवाडी येथे संत बाळूमामा भंडारा उत्सव/राष्ट्रसंत अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती...

धनगरवाडी येथे संत बाळूमामा भंडारा उत्सव/राष्ट्रसंत अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती निमित्त हरी किर्तन सोहळा सर्व भक्तांनी अधिक मास महाप्रसादाचा लाभ घ्यावा : माजी सभापती शिवाजीराव सुरवसे

80

धनगरवाडी येथे संत बाळूमामा भंडारा उत्सव/राष्ट्रसंत अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती निमित्त हरी किर्तन सोहळा

सर्व भक्तांनी अधिक मास महाप्रसादाचा लाभ घ्यावा : माजी सभापती शिवाजीराव सुरवसे

सुवर्ण भारत: गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड जिल्हा : आष्टी तालुक्यातील मौजे धनगरवाडी येथे चोखामेळा वारकरी बहुजन सेवा संघ महाराष्ट्र राज्य /शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य/ राष्ट्रीय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व खा. क्रांतिसिंह नाना पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संघ बीड जिल्हा आयोजित संत बाळूमामा भंडारा उत्सव व राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती निमित्त हरिकीर्तन सोहळा व अधिकमास महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी ह.भ.प. दयाधन महाराज (रामनंद स्वामी सेवा आश्रम पंढरपूर ) यांचे जाहीर हरी किर्तन सायंकाळी ६ ते ९ या वेळात आयोजित करण्यात आले असून आष्टी तालुक्यातील सर्व स्तरातील भाविक भक्त/ नागरिक माता- भगिनी/ युवकवर्गांनी/ धार्मिक- सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कामगार पक्ष शेतकरी संघटना आणि क्रांतीसिंह नाना पाटील ज्येष्ठ नागरिक संघ व सचिव माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाई शिवाजीराव बाबुराव सुरोशे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे .