Home Breaking News महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार– प्रशासनाने झोपेतून जागे व्हावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन–...

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार– प्रशासनाने झोपेतून जागे व्हावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन– मोरे/ खेडकर

88

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार–
प्रशासनाने झोपेतून जागे व्हावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन– मोरे/ खेडकर

सुवर्ण भारत:गोरख मोरे
बीड जिल्हा,प्रतिनिधी

 

शिरूर कासार( जिल्हा बीड) तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जाटनांदूर अंतर्गत येणाऱ्या सवसवाडी परिसरामध्ये महावितरणचा अत्यंत जीवघेणा आणि बेजबाबदार कारभार समोर आला .
​सध्या सवसवाडी परिसरातील अनेक वीज खांबांवरच्या (पोल) तारा थेट जमिनीवर लोळत पडलेल्या असुन पावसाळा तोंडावर आला आणि सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतकरी बांधव शेतात कामाच्या गडबडीत असुन आज शेतात लोखंडाच्या तिफणी वापरल्या जातात, अनेकदा शेतकरी बांधवांना तीफण खांद्यावर घेऊन जावे लागते. अशा परिस्थितीत जमिनीवर पडलेल्या या जिवंत वीज तारांमुळे मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणच्या या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागल्याचे दिसत आहे.
​ शिरूर कासार तालुक्यातील उपकार्यकारी अभियंता व
इंजिनियर यांना जाहीर विनंती व इशारा—
पावसाळा सुरू होण्यापूर्वी सवसवाडी परिसरातील जमिनीवर पडलेल्या सर्व वीज तारा तातडीने वरती घ्या, योग्य मेंटेनन्स करा आणि शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालणे बंद करा!
​ हा केवळ विनंती वजा इशारा नाही…
जर पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण झाले नाही, तर सर्व शेतकरी बांधव आणि माता-भगिनींना सोबत घेऊन महावितरणच्या ऑफिससमोर ‘चक्का जाम रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शिरूर कासार तालुकाप्रमुख सोपान मोरे व शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख आजिनाथ खेडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले असून
​सोबत सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि समस्त शेतकरी बांधव, सवसवाडी सोबत राहणार असल्याचे सांगितले .