Home Breaking News आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनास (उबाठा)चे तालुकाप्रमुख सोपान मोरे यांच्यासह शेतकरी बांधवांचा...

आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनास (उबाठा)चे तालुकाप्रमुख सोपान मोरे यांच्यासह शेतकरी बांधवांचा जाहीर पाठिंबा—

37
Oplus_131072

​आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनास (उबाठा)चे तालुकाप्रमुख सोपान मोरे यांच्यासह शेतकरी बांधवांचा जाहीर पाठिंबा—

सुवर्ण भारत: गोरख मोरे 
बीड जिल्हा प्रतिनिधी

पंढरपूरच्या पवित्र भूमीत, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आमदार रोहित पवार हे ‘अन्नत्याग उपोषण’ करत बसले होते .
​शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळावे आणि त्यांच्या हक्काचा लढा अधिक बळकट व्हावा, याच उदात्त हेतूने रोहित स्वतः या आंदोलनात उतरले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या या पवित्र लढ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शिरूर कासार (जिल्हा बीड ) तालुकाप्रमुख या नात्याने आणि तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने अन्नत्याग आंदोलन स्थळी सोपान मोरे यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला .
​शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही सर्वजण रोहित पवारांच्या या आंदोलनासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे या प्रसंगी सोपान मोरे यांनी सांगितले .
या प्रसंगी ​पाठिंबा देतेवेळी
संजय भिंगले,संदीप सानप,
प्रकाश भिलारे यांच्यासह आदी शेतकरी बांधव उपस्थित होते .​ शेतकरी राजा सुखी तरच देश सुखी! हा लढा आपल्या सर्वांच्या हक्काचा असल्याचे या प्रसंगी सोपान मोरे शिरूर कासार तालुकाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट यांनी रोहित पवार यांच्या आंदोलन स्थळी सांगितले .
​