Home Breaking News शार्दुल पचारे यांचा वाढदिवस निराधारांच्या सोबत साजरा…

शार्दुल पचारे यांचा वाढदिवस निराधारांच्या सोबत साजरा…

35

शार्दुल पचारे यांचा वाढदिवस निराधारांच्या सोबत साजरा…

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

चिमूर : तालुक्यातील मौजा जामगाव येथील दिव्यवंदना आधार फाउंडेशन व मराठा लाईफ फाउंडेशन वृद्धाश्रमात श्री.शार्दुल दिलीप पचारे यांचा वाढदिवस उत्सहात साजरा करण्यात आला.
संपूर्ण कुटुंबियांसमवेत सदर वृद्धाश्रमाला भेट देण्यात आली.यानंतर तेथील निराधारांसोबत शार्दुल पचारे यांनी स्वत:चा वाढदिवस आनंदमय वातावरणात साजरा केला.
वाढदिवसानिमित्त निराधारांना नाश्ता देण्यात आले.निराधारांनी नाश्ता करताच त्यांच्या मनात आनंद निर्माण झाला.तद्वतच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

शार्दुल पचारे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधारांनी चांगल्या प्रकारे नृत्य करून उत्साहात भर घातली.यानिमित्ताने शार्दुल पचारे आणि त्यांच्या आई-वडिलांनी वृध्दाश्रमाच्या भेट अंतर्गत निराधार व्यक्तींची परिस्थिती जाणून घेतली…
मौजा जामगाव कोमटी वृध्दाश्रमातील निराधारांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा मानस साध्य झाल्याने शार्दुल पचारे व त्यांच्या आई-बाबांनी समाधान व्यक्त केले.