आष्टी पंचायत समोरील उपोषणाला भेट दिल्याच्या कारणावरून राजू शेलार यांना जीवे मारण्याची धमकी—
आंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल–
सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील मौजे बाळेवाडी या गावात झालेल्या भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणाविरोधात आष्टी जिल्हा बीड) येथे बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या उपोषणाला भेट का दिली या कारणावरून राजू शेलार यांना गावातील ऋषिकेश बोंद्रे यांनी तू’रस्त्यावर दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवार दि. १३ जून २०२६ रोजी घडली . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी आंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली .
आष्टी येथील पंचायत समिती समोर मौजे बाळेवाडी या गावात कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणाला बसले होते. या उपोषणाला अनेक सामाजिक कार्यकर्ते /नागरिक/पत्रकारांनी भेटी दिल्या दरम्यान, आपल्या गावातील ग्रामस्थ आष्टी येथे उपोषणाला बसले असल्याने राजू शेलार यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली . याचा राग मनात धरून गावातील ऋषिकेश बोंद्रे याने राजू शेलार यांना तू कुठे आहेस असे फोनवर विचारले असता राजू शेलार यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या समोर असल्याचे सांगितले . ऋषिकेश बोंद्रे हा त्या ठिकाणी येऊन तू आष्टी पंचायत समिती समोर सुरू असलेल्या उपोषणाला भेट का दिली ?आमच्या विरोधात हालचाली केल्यास आणि रस्त्यावर दिसलास तर तुला जीवे मारू अशी धमकी दिल्याचा आरोप राजू शेलार यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रारीत केला . या धमकीमुळे संबंधित व्यक्ती व त्याच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले .
दरम्यान, या प्रकरणी राजू शेलार यांनी आंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली .
या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक आंदोलनांमध्ये सहभाग आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पुढील तपास आंभोरा पोलीस करत आहेत .







