गणेशपुर येथे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून पीक नियोजनावर गटचर्चा
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस: नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, दारव्हा संचालित कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव (आर.ए.डब्लू.इ ) कार्यक्रमांतर्गत १४ जुन रोजी गणेशपुर येथे पीक नियोजन या विषयावर शेतकऱ्यांसोबत गटचर्चा आयोजित करण्यात आली.
या उपक्रमात कृषी विद्यार्थिनी खुशबू साखरकर, कल्याणी सवाईशाम, साक्षी शेंदुरकर, धनश्री विधाते, प्रेरणा वाढवे यांनी शेतकऱ्यांना पीक नियोजनाचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी हंगामानुसार योग्य पिकांची निवड, जमिनीचा प्रकार व पाण्याची उपलब्धता, बाजारपेठेतील मागणी व भावाचा अंदाज तसेच पीक फेरपालटाचे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या गटचर्चेत शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा पिकांच्या नियोजनाबाबत विविध शंका उपस्थित केल्या, ज्याचे विद्यार्थिनींनी समाधानकारक निरासन केले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्राचार्य पी. ए. खाडे, विषय विशेषज्ञ अघम तसेच कार्यक्रमाचे प्रभारी प्रा. देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.







