Home Breaking News भाजपा तर्फे घुग्घुस येथे जागतिक योग दिवस शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग...

भाजपा तर्फे घुग्घुस येथे जागतिक योग दिवस शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग करा- संजय तिवारी

85

भाजपा तर्फे घुग्घुस येथे जागतिक योग दिवस

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग करा- संजय तिवारी

घुग्घुसः घुग्घुस येथील महामानव प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम रविवार, 21 जून रोजी सकाळी भाजपातर्फे जागतिक योग दिवसानिमित्त योग महोत्सवाचे भाजपा अध्यक्ष संजय तिवारी यांनी आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष संजय तिवारी म्हणाले, योग ही आपली प्राचीन संस्कृती आहे. योगाला जगाच्या पाठीवर नेण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पहिला जागतिक योग दिवस २१ जून २०१५ पासून सुरु झाला तेव्हा पासून योगाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. आज जगभरात योग दिवस साजरा केला जातो. सर्व जाती धर्माचे लो योगाकडे वळत आहे शरीराला व स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी दररोज योगा करणे आवश्यक आहे. याप्रसंगी सर्वांनी योगाचे विविध आसने केली व कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी, घुग्घुसच्या वतीने योग प्रशिक्षक शंकर क्षीरसागर व सुधीर गुडेलीवार यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी भाजप शहर अध्यक्ष संजय तिवारी,महिला अध्यक्षा सुचिता लुटे,रामपाल वर्मा,शैलेश बांगडे,रमेश यादव, विलास पानघाटे,अंबिका सिंह, राजेश शाहु, शंकर क्षीरसागर, कविता क्षीरसागर,जयश्री राजुरकर, सुनीता घिवे,रवींद्र घिवे, आरोही घिवे,सुनीता पाटील,अर्चना कुंभारे, नंदिनी कुंभारे ,मोना खडसे,सुरेखा सांगडीकर, रुंदा काँगरे,एकता पाऊलबुढे,ज्योती साठे,बंडू सातपुते,गजानन ढाकणे,मंगेश तुरणकर, अयान क्षीरसागर, परिसरातील नागरिक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.