आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात डाॅ.श्यामा प्रसाद मुखर्जी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
सुवर्ण भारत:पंकज रामटेके (विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)
घुग्घुस : आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दि.२३ जुन २०२६ रोजी आ.किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनातून भाजपाचे सक्रिय कार्यकर्त्यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक डाॅ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमत्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच भाजपाचे सक्रिय कार्यकर्त्ता राजेश मोरपाका यांनी डाॅ.श्यामा प्रसाद याच्या विचार सांगण्यात आले की,डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी हे भारतातील एक प्रखर राष्ट्रीय विचारवंत, थोर शिक्षणतज्ज्ञ, आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष होते. भारताची अखंडता आणि एकात्मतेसाठी त्यांनी घेतलेली वैचारिक भूमिका भारतीय राजकारणाला नवी दिशा देणारी ठरली. २३ जून १९५३ रोजी श्रीनगर येथील तुरुंगात संशयास्पद परिस्थितीत त्यांचे निधन झाले. भारताच्या अखंडतेसाठी त्यांनी प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिल्यामुळे २३ जून हा दिवस देशभरात ‘बलिदान दिन’ म्हणून पाळला जातो.
याप्रसंगी भाजपचे सक्रिय नेते राजेश मोरपाका, विशाल दामेर, चिरू तालापेल्ली,सतिश कांमपेल्ली,स्वप्नील वाढई तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.







