विसापुरात पोलिओ लसीकर्णाला उत्स्फुर्त प्रतिसाद
१०७ टक्के झाले लसीकरण

विसापूर:-केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतात पोलिओचे राबविण्यात आले. या मध्ये विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अठरा बुथ लावण्यात आले होते त्यामध्ये ७२१ लाभार्थी अपेक्षित होते परंतु अधिक झाले आहे एकूण लाभार्थी ७७३ झाले.या मध्ये प्रा.आ. केंद्र. विसापूर,विसापूर अंगणवाडी क्र. १४,विसापूर अंगणवाडी क्र. ०२,विसापूर अंगणवाडी क्र. ०१
,विसापूर अंगणवाडी क्र. ०५,विसापूर अंगणवाडी क्र. ०७,चुनाभट्टी,जि. प. शाळा नांदगाव,उपकेंद्र नांदगाव,डीस्पेन्सरी डब्लू.सि.एल. नांदगाव,अंगणवाडी चारवट,अंगणवाडी हडसती,अंगणवाडी भिमनगर,उपकेंद्र शिवनी,अंगणवाडी हिंगनाला,नवीन सैनिक स्कूल भिवकुंड,बोटानिकल गार्डन (दर्गा रोड),कन्ट्रशन साईट विसापूर या ठिकाणी बुथ लावण्यात आले होते. या लसीकरण्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी कांबळे, आरोग्य सहायक पंजाब चौधरी,बेबी शेरकी, आरोग्य शेविका प्रियदर्शनी निरंजने, रेणुका इटनकर, परिचारिका संगीता रत्नपारखी, कांता जुनघरे,रंजना खेडेकर यांनी अथक परिश्रम घेतले तसेच गावातील आशा व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.






