Home Breaking News विसापुरातील सुवासिनींनी पतिव्रत सन केला साजरा

विसापुरातील सुवासिनींनी पतिव्रत सन केला साजरा

137

विसापुरातील सुवासिनींनी पतिव्रत सन केला साजरा

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम (बल्लारपूर प्र

तिनिधी) 

विसापूर-सौभाग्याचे लेणे…साताजन्माची गाठ वटपौर्णिमेच्या मंगलदिनी दीर्घायुष्य मिळो पतीला,सुखी होवो संसार… हीच प्रार्थना प्रत्येक सुवासिनी स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी करते. हा दिवस सुवासिनी महिलांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो. साताजन्मासाठी आपल्याला हाच पती मिळावा व संसार आनंदाचा व्हावा यासाठी सुवासिनी व्रत व पूजा करतात.सोळा शृंगार करून सुवासिनी सजल्या. भरजरी साडी,गळ्यात मंगळसूत्र हातात चुडा आणि कपाळी कुंकू असा साज करून वटपौर्णिमेच्या पूजेला महिला सज्ज झाल्या. उद्या २९ जून रोजी वटपौर्णिमा असल्याने सर्व विवाहित महिला या दिवसासाठी उत्सुक असल्याचे पहायला मिळते. काहीजणींची यंदा पहिलीच वटपौर्णिमा होती. नववधूंसाठी वटपौर्णिमेचे व्रत हे खास मानले जाते. पतीच्या दीर्घयायुष्यासाठी सुवासिनी व्रत करतात व वडाला सात फेरे मारून आपल्याला हाच पती साताजन्मासाठी मिळावा अशी प्रार्थना करतात त्या निमित्ताने विसापुरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा साजरी केली.