Home Breaking News आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात १२५वी डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त अभिवादन डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांनी...

आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात १२५वी डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त अभिवादन डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांनी देशाला ‘ राष्ट्र प्रथम’ हा विचार दिला – सुचिता लुटे

117

आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात १२५वी डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त अभिवादन

डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांनी देशाला ‘ राष्ट्र प्रथम’ हा विचार दिला – सुचिता लुटे

घुग्घुस येथील आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दि.६ जुर्ले २०२६ सोमवार रोजी
डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५वी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मान्यवरांनी अभिवादन करण्यात आले.
आ.किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भाजप शहर अध्यक्षा सौ.सुचिताताई लुटे यांनी पदाधिकारी,कार्यकर्तेला सांगण्यात आले की, ६ जुलै १९०१ रोजी कोलकात्यात जन्मलेले डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी हे एक प्रखर राष्ट्रवादी, शिक्षणतज्ज्ञ, आणि भारताचे पहिले उद्योग व पुरवठा मंत्री होते. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी ते कलकत्ता विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू झाले. त्यांनी देशाला ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार दिला.अखंड भारताचे स्वप्न आणि जनसंघाची स्थापना:स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय संस्कृती आणि मूल्यांवर आधारित राजकारणाची गरज ओळखून १९५१ मध्ये ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली, जो आजचा भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखला जातो. देशाच्या फाळणीच्या वेळी त्यांनी पश्चिम बंगालला भारतात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.काश्मीरसाठी बलिदान:जम्मू आणि काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणाऱ्या ‘कलम ३७०’ ला त्यांचा तीव्र विरोध होता. त्यांनी “एक देशात दोन विधान, दोन प्रधान आणि दोन निशाण चालणार नाही,” असा नारा दिला. या ध्येयासाठी त्यांनी १९५३ मध्ये काश्मीरमध्ये प्रवेश केला, जिथे त्यांना अटक करण्यात आली आणि २३ जून १९५३ रोजी संशयास्पद परिस्थितीत त्यांचे निधन झाले.

याप्रसंगी भाजप घुग्घुस महिला शहर अध्यक्षा सौ. सुचिताताई लुटे, श्री.स्वप्नील वाढई,सौ.सुनीता पाटील, सौ. सुनीता घीवे,सौ. सविता गोहणे, सौ.नितू जैस्वाल, सौ. संध्या जगताप, श्री.दिपक खुंडे उपस्थित आदी होते.