Home Breaking News वृक्षारोपणाने बच्चुभाऊंच्या वाढदिवसाची सुरुवात; घुग्घुसमध्ये समाजसेवेच्या विविध उपक्रमांनी वेधले लक्ष

वृक्षारोपणाने बच्चुभाऊंच्या वाढदिवसाची सुरुवात; घुग्घुसमध्ये समाजसेवेच्या विविध उपक्रमांनी वेधले लक्ष

43
Oplus_131072

वृक्षारोपणाने बच्चुभाऊंच्या वाढदिवसाची सुरुवात;

घुग्घुसमध्ये समाजसेवेच्या विविध उपक्रमांनी वेधले लक्ष

घुग्घुस : प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोलभाऊ मांढरे यांच्या पुढाकाराने जननेते बच्चुभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाने करण्यात आली. त्यानंतर गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले, तसेच दिव्यांग बांधवांना दुपट्टे व पाण्याच्या बाटल्या भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यानंतर आयोजित भजन कार्यक्रमात भजन मंडळाने भक्तिमय वातावरणात सुरेल भजन सादर करून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी बच्चुभाऊ यांनी सर्वसामान्यांच्या न्याय, हक्क, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या संघर्षमय कार्याचा गौरव केला. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत समाजसेवा आणि जनहिताची चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश, गरजू महिलांना साड्यांचे वाटप, दिव्यांग बांधवांचा सन्मान आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेला भजन कार्यक्रम यामुळे बच्चुभाऊ यांचा वाढदिवस केवळ उत्सव न ठरता समाजसेवा, माणुसकी आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. या उपक्रमाचे नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.