एक अभिप्राय – प्रा.राजश्री पाटील यांचा!

‘विदर्भाचा वीर’ हे मराठी साप्ताहिक अन्याय-अत्याचाराविरोधात बुलंद आवाज उठवणारे आणि समाजाचा जिवंत आरसा ठरणारे माध्यम आहे. या अंकात पीडित महिलेचा लढा, माथाडी कामगारांचे आंदोलन आणि रस्त्यांचे प्रश्न यांसारख्या ज्वलंत सामाजिक समस्यांना परखडपणे वाचा फोडण्यात आली आहे. त्याच वेळी मॅरेथॉन स्पर्धा, शालेय साहित्याची खरेदी, आणि ‘कुर्माघर’ नाटकासारखे सांस्कृतिक विषयही तितक्याच प्रभावीपणे हाताळले आहेत. अंकातील दर्जेदार संपादकीय मनाला अंतर्मुख करते, तर विशेष ‘साहित्य पुरवणी’मधील पाऊस, नातेसंबंध आणि मानवी भावनांवर आधारित कविता व लेख वाचकांना खिळवून ठेवतात. आरोग्य साधना, कर्तृत्ववान महिलांची शून्यातून भरारी आणि स्थानिक कलावंतांचा केलेला गौरव यांमुळे हा अंक अधिकच समृद्ध झाला आहे. एकाच अंकात बातम्या, ज्वलंत प्रश्न आणि उत्कृष्ट साहित्याचा सुंदर मेजवानी देणाऱ्या संपूर्ण संपादक मंडळ चे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे.






