जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन दहेली येथे विद्यार्थ्यांना छत्री वाटप
सुवर्ण भारत : वैभव मेश्राम (प्रतिनिधी, बल्लारपूर)
दहेली (बल्लारपूर) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन दहेली येथे शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करून शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला अंकुश जीवने, अमिश मेश्राम, सुमित गोरघाटे, विलास माऊलीकर, विकास निरंजने, नितीन खानोरकर, साहिल मेश्राम, यश नारळे, हर्षल निमसरकर, वैभव निमसरकर तसेच शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वीरीत्या पार पडले असून, या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थ आणि पालकांकडून कौतुक करण्यात आले.







