
भद्रावती नियतक्षेत्रात अवैध वाळू तस्करीवर वनविभागाची धडक!
ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त, वाहनमालकावर वनगुन्हा दाखल
प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती: भद्रावती वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्रात अवैधरित्या वाळू/रेतीचे उत्खन व वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर वनविभागाने मोठी कारवाई केली. महिंद्रा YUVO TECH 548 DI ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून वाहन मालकावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 7/07/2026 रोजी रात्री 11.45 वाजता गुप्त माहितीच्या आधारे राजन तलमले, विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व विकास तरसे, सहायक वनसंरक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली के. डब्ल्यू. धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांच्या नेतृत्वात पथकाने तपासणी केली.
बसंता आनंदराव बोडे, रा. मांगली ता. भद्रावती यांच्या मालकीचा MH-34-TC-165 क्रमांकाचा महिंद्रा ट्रॅक्टर व नंबर नसलेली ट्रॉली शासकीय वनातील नाल्यातून अवैध रेती उत्खनन करून मानोरा-तांडा रोडवर वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.
वनकर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी केली असता रेती उत्खनन व वाहतूक परवानग्याबाबत कोणतेही कागदपत्र सापडले नाही.
त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. तसेच वाहन मालकावर वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या मोहिमेत के. एन. घुगलोत, क्षेत्र सहायक भद्रावती, एस. पी. पारवे, वनरक्षक भद्रावती व वनमजूर यांनी सहभाग घेतला.
अवैध वाळू उत्खन रोखण्यासाठी यापुढेही शोधमोहीम सुरू राहणार असल्याचे वनविभागाने सांगितले.
___________________________________
🌲 वनातील अवैध वाळू उपसा उधळला!
*भद्रावती नियतक्षेत्रात रात्री 11.45 वा. वनविबागाची धाड. शासकीय नाल्यातून रेती वाहतूक करणारा MH-34-TC-165 ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त. बसंता बोडे रा. मांगली यांच्यावर वनगुन्हा. DFO राजन तलमले यांच्या मार्गदर्शनात कारवाई. अवैध उत्खननावर पुढेही धडक मोहीम.*






