Home Breaking News एसटी महामंडळाचा राज्यभरात वृक्षारोपण उपक्रम घुग्घूसमध्ये उत्साहात वृक्षारोपण, ‘हरित महाराष्ट्र’चा संदेश

एसटी महामंडळाचा राज्यभरात वृक्षारोपण उपक्रम घुग्घूसमध्ये उत्साहात वृक्षारोपण, ‘हरित महाराष्ट्र’चा संदेश

29
Oplus_131072

एसटी महामंडळाचा राज्यभरात वृक्षारोपण उपक्रम

घुग्घूसमध्ये उत्साहात वृक्षारोपण, ‘हरित

महाराष्ट्र’चा संदेश

घुग्घूस : एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आज राज्यभरात ‘वृक्षारोपण उपक्रम’ राबविण्यात आला. याचाच एक भाग म्हणून घुग्घूस बसस्थानक येथे सकाळी १०:३० वाजता भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

“आज एक वृक्ष लावूया, उद्याच्या हिरवे भविष्य घडवूया!” या ब्रीदवाक्यासह झालेल्या या कार्यक्रमात “हरित महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र” आणि “एक वृक्ष हजार श्वासांचा वारसा भावी पिढ्यांसाठी” या संकल्पना मांडण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घुग्घूस नगर परिषदेच्या अध्यक्षा मा. दीप्ती ताई सोनटक्के होत्या. प्रमुख पाहुणे आरोग्य व स्वच्छता सभापती मा.नूरुल सिद्दीकी, वृक्षारोपण विशेष अतिथी ऋषीकेश होले सर उपस्थित होते.

यावेळी श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुकरजी मालेकर, सचिव निळकंठजी नांदे, स्वच्छता दूत मारोती जुमनाके सर, नंदकुमारजी ठेंगणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे मधुकरजी जांभुळकर,अनिल मानकर, सामाजिक कार्यकर्त्या उषाताई आगदारी, मायाताई सांड्रावार, लॉयड्स इन्फिनिटी फाउंडेशनची टीम, वाहतूक निरीक्षक नंदकिशोर वैद्य, स्वच्छता सुपरवायझर प्रशांत रामटेके, महामंडळ कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून रोपांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोती जुमनाके यांनी केले तर आभार नंदकिशोर वैद्य यांनी मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

एसटी महामंडळाने “झाडे लावा, झाडे जगवा” असा आवाहन करत पर्यावरण संवर्धन ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्य, कोटावार,मारोती जुमनाके व प्रशांत रामटेके यांनी परिश्रम घेतले.