विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लढा–
सोनम वांगचुक सरांच्या आंदोलनाला शिरूर कासार शिवसेनेचा जाहीर पाठिंबा–
सोपान मोरे/आजिनाथ खेडकर
सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
7709311525

आज देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असुन लडाखमध्ये विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या हक्कासाठी सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) सर गेल्या १८ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असुन त्यांच्या या पवित्र लढ्याला आज १८ जुलै रोजी शिरूर कासार तालुक्यातून (जिल्हा बीड) जाहीर पाठिंबा देण्यात आला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने, शिवसेना तालुकाप्रमुख सोपान मोरे यांच्या नेतृत्वाखाली / शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजिनाथ खेडकर यांच्या प्रमुख सहकार्याने, आणी शेकडो विद्यार्थी बांधवांच्या खंबीर पाठबळावर आज शनिवार रोजी शिरूर शहरातील जिजामाता चौकात तीव्र निदर्शन आंदोलन करून वांगचुक सरांच्या उपोषणाला या प्रसंगी जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला .
सरकारच्या हुकूमशाहीचा अंत जवळ आलाय–
इतिहास साक्षिदार आहे, २०११ मध्ये जेव्हा आदरणीय अण्णा हजारे यांचे उपोषण १३ व्या दिवसात आले होते, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तात्काळ दखल घेत लोकपाल विधेयक मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज दुसरीकडे, सोनम वांगचुक सरांच्या उपोषणाचा १८ वा दिवस उजाडला, तरी अद्याप या निर्दयी सरकारकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही! ही हुकूमशाही नाही तर काय?
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
आज देशात आणि राज्यात स्पर्धा परीक्षांचा पुरता बट्ट्याबोळ झाला असून UPSC, MPSC चे पेपर फुटतात, NEET चा पेपर फुटतो, आणि आता अलीकडे तर TET चा सुद्धा पेपर फुटला! वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून अभ्यास करणाऱ्या गरीब/कष्टकरी विद्यार्थ्यांचे यामुळे अतोनात नुकसान झाले . नैराश्यातून आमचे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत.
या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? थेट शिक्षण मंत्री! आणि सोनम वांगचुक सरही हेच सांगत आहेत की अशा अपयशी शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. मग सरांचं काय चुकतंय? असा प्रश्न या प्रसंगी उपस्थित करण्यात आला .
लढा विद्यार्थ्यांच्या हक्काचा–
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आणि सोनम वांगचुक सरांच्या समर्थनासाठी आज शिरूर कासार तालुका शिवसेना विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरली असुन हा लढा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्काचा असल्याने आम्ही तो शेवटपर्यंत लढणार असल्याचे शिरूर कासार येथे आंदोलन स्थळी शिवसेना तालुकाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोपान मोरे/ बीड जिल्हा उपप्रमुख आजिनाथ खेडकर यांनी आंदोलन स्थळी बोलताना सांगितले . या प्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी /सर्व स्तरातील नागरिक आंदोलन स्थळी सहभागी झाले होते .






