Home Breaking News जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दाखवली शासकीय आदेशाला केराची टोपली

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दाखवली शासकीय आदेशाला केराची टोपली

29
Oplus_131072

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दाखवली शासकीय आदेशाला केराची टोपली

प्रतिनिधी -कृष्णाजी चव्हाण

चंद्रपूर-: ग्रामपंचायत कोठारी, ता. बल्लारपूर येथील नियमबाह्य नियुक्त्या व जादा वेतन प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.20/01/2025 रोजी आदेश क्र. पंचायत/ट-6/आदेश/610/2025 काढला होता. परंतु 6 महिने उलटूनही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.याबाबत शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांनी दि.17/07/2026 रोज शुक्रवारला जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत असे म्हटले आह. की,दि.16/07/2026 रोजी ते, चंद्रकांत राजुरकर व सुरेश चहारे यांच्यासोबत CEO यांना भेटायला गेले असता CEO यांनी “7 दिवसात कार्यवाही करतो, आत्ता लवकर निघून जा” असे म्हणून अरेरावी करून गैरवर्तन केले.पारखी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदर प्रकार हा महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, 1979 च्या नियम 3, 7, 20 आणि 21 चा भंग आहे. संबंधित संवर्ग विकास अधिकारी, पं.स. बल्लारपूर हे ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांना सहकार्य करीत असून कोठारी ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार व CEO कडून तक्रारदारांचा अपमान झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी 7 दिवसात आदेशाची अंमलबजावणी करून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची संतोष पारखी मागणी केली आहे.
भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा विभागीय आयुक्त व ग्रामविकास आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा देखील संतोष पारखी यांनी निवेदनातून दिला आहे.