Home Breaking News • भाजप- माँ शक्ती मंडळाचा स्तुत्य उपक्रम – देवेंद्र फडणवीसांच्या जन्मदिनी घुग्घुसमध्ये...

• भाजप- माँ शक्ती मंडळाचा स्तुत्य उपक्रम – देवेंद्र फडणवीसांच्या जन्मदिनी घुग्घुसमध्ये रक्तदानाचा जागर   • आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते सहभागी, “रक्तदान हेच जीवनदान” चा संदेश

28
Oplus_131072

• भाजप- माँ शक्ती मंडळाचा स्तुत्य उपक्रम – देवेंद्र फडणवीसांच्या जन्मदिनी घुग्घुसमध्ये रक्तदानाचा जागर

  • आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते सहभागी, “रक्तदान हेच जीवनदान” चा संदेश

घुग्घुस : भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा यांच्या वतीने आणि माँ शक्ती माँ दुर्गा मंडळ, घुग्घुस यांच्या संयुक्त आयोजनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “देवाभाऊ सेवा सप्ताह” अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला घुग्घुस परिसरातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश संचारला. आमदार जोरगेवार यांनी स्वतः रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, _”रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. एका बाटली रक्ताने 3 जणांचे प्राण वाचू शकतात. म्हणून प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे.”_

 

या शिबिरात घुग्घुस परिसरातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

 

आयोजकांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस केवळ शुभेच्छा देऊन न साजरा करता, समाजाला उपयोगी पडणारे कार्य करून साजरा करण्याचा हा संकल्प आहे. तालुक्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची कमतरता भासू नये आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

या शिबिराला यशस्वी करण्यासाठी माँ शक्ती माँ दुर्गा मंडळाचे सर्व पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वैद्यकीय पथकाने मोलाचे सहकार्य केले. शिबिराच्या शेवटी सर्व रक्तदाते, सहकारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आयोजकांनी आभार मानले.

याप्रसंगी भाजप गटनेत्या तसेच नगरसेविका मीनाता राजेश मोरपाका,भाजप महिला शहर अध्यक्षा सुचिता लुटे, नगरसेवक गणेश पिंपळकर,राजेश मोरपाका,मयुर कलवल,राजेश डाखुर, गुड्डु शेख,सुरज मोरपाका,विशाल दामेर,वमषी महाकाली,स्वप्नील वाढई,चिरंजीवी तालापेल्ली,शुभम शेंडे,सतीश कांपेला, सुनिता पाटील,अनिल राम,शुभम जेऊरकर मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.