NEET पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी; कोरपना काँग्रेसचे तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
सुवर्ण भारत मोबीन बेग
कोरपना, प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, कोरपना तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष उत्तम ज्ञानाजी पेचे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबत तहसीलदार, कोरपना यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सर्वोच्च पातळीवर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय आंदोलनादरम्यान विद्यार्थी व युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय तातडीने घ्यावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी जिल्हा मध्यवती सहकारी बँक संचालक विजय बावणे, माजी सभापती श्याम रणदिवे, खरेदी-विक्री उपाध्यक्ष भाऊराव चव्हाण, नगरपरिषद उपाध्यक्ष संजय मेंढी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश गोडे, नगरपरिषद उपाध्यक्ष इस्माईल भाई, नगरपरिषद नगरसेवक नितीन बावणे, मीडिया तालुकाध्यक्ष रोशन आस्वले, सरपंच रोशन मरापे, सरपंच विलास आडे, जेस्ट नेता सुरेश मालेकर, ओबीसी तालुका काँग्रेस अध्यक्ष राहुल मालेकर शहराध्यक्ष गडचंदुर साजिद अली, नगरपरिषद आरोग्य सभापती तुषार बावणे, माजी सरपंच शंकर पेचे, काँग्रेस कार्यकर्ते अविनाश गोहरकर, काँग्रेस कार्यकर्ते अशोक माडस्वार, नगरपरिषद नगरसेवक निसार भाई, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ध्यानेश्वर आवारीशहर अध्यक्ष प्रशांत लोडे,माजी सरपंच घनश्याम नांदेकर विजय पिंपळसेंडे, विवेक येरणे, सरपंच रमेश मेश्राम उपसरपंच शबीर शेख मिलिंद ताकसांडे, तुडशीराम भोगळे,ताराचंद मुके लिंगाची वेटी, माजी उपसरपंच सुधाकर नांदेकर, उपसरपंच सुदर्शन डवरे मोहमत शेख, सरपंच रवी जुमनाके मोतीराम सोयाम निलेश कोवे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसच्या वतीने संबंधित मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.







