Home Breaking News देवाभाऊ सेवा सप्ताहात जिवती तालुका आरोग्यमय; १५०३ नागरिकांची मोफत तपासणी तर २४८...

देवाभाऊ सेवा सप्ताहात जिवती तालुका आरोग्यमय; १५०३ नागरिकांची मोफत तपासणी तर २४८ रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया! आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद!

30
Oplus_131072

• देवाभाऊ सेवा सप्ताहात जिवती तालुका आरोग्यमय; १५०३ नागरिकांची मोफत तपासणी तर २४८ रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया!

• आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद!

प्रतिनिधी -कृष्णाजी चव्हाण.

जिवती-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या ‘देवाभाऊ सेवा सप्ताहा’अंतर्गत जिवती येथील शासकीय आश्रमशाळेत भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकांक्षित जिवती तालुक्यातील १५०३ गरजू नागरिकांनी या शिबिरात वैद्यकीय उपचारांचा लाभ घेतला, तर विविध गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या २४८ रुग्णांवर पुढील टप्प्यात पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
जिवतीसारख्या दुर्गम आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या सर्वसामान्यांना अनेकदा हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे वेळेवर वैद्यकीय सल्ला, तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार आणि महागड्या शस्त्रक्रिया परवडत नाहीत. दुर्गम भागातील याच गोरगरिबांचे दुःख जवळून अनुभवलेल्या आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा औचित्याने आरोग्य सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवण्याचा ध्यास घेतला. या शिबिरासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील निष्णात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाला विशेष पाचारण करण्यात आले होते. या वैद्यकीय पथकाने रुग्णांची अत्यंत बारकाईने तपासणी करून मोफत औषधोपचार, वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशन केले. पात्र ठरलेल्या २४८ रुग्णांवर तुकडीनिहाय टप्प्याटप्प्याने मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याने शेकडो पीडित कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली आहे.
या महाआरोग्य शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या कॅन्सर व्हॅन आणि दंतचिकित्सा व्हॅनच्या माध्यमातून शेकडो नागरिकांची मोफत कर्करोग आणि दंत तपासणी करण्यात आली. दंत महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी अनेकांवर घटनास्थळीच थेट उपचार केले. तसेच शिबिरस्थळी हजारो रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करून आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते गरजू रुग्णांना जागेवरच मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. “आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे केवळ राज्याचे नेतृत्व करणारे मुत्सद्दी नेते नसून, संवेदनशील अंतःकरणाचे आणि अहोरात्र जनसेवेत तत्पर असणारे महान सेवाभावी व्यक्तिमत्त्व आहेत. गोरगरिबांच्या वेदना जाणणाऱ्या त्यांच्या याच संवेदनशीलतेतून राज्यात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष’ साकारला, ज्याने लाखो अनाथ, गरीब आणि असाध्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना जीवनदान दिले आहे. सत्ता हे त्यांच्यासाठी साधन नसून समाजातील शेवटच्या घटकाची निस्वार्थ सेवा करण्याचे माध्यम आहे. त्यांनी महाराष्ट्राला केवळ विकासाच्या नव्या शिखरावर नेले नाही, तर आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात युगांतरकारी क्रांती घडवून आणली आहे. अशा लोकनेत्याचा वाढदिवस साजरा करण्याचा यापेक्षा दुसरा कोणता सर्वोत्तम मार्ग असू शकत नाही,” अशा शब्दांत आमदार भोंगळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, माजी पंचायत समिती उपसभापती महेश देवकते, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, शहराध्यक्ष राजेश राठोड, गोविंद टोकरे, तुकाराम वारलवाड, भीमराव पवार, नायब तहसीलदार प्रदीप सिंग, नायब तहसीलदार संजय कानकाटे, संवर्ग विकास अधिकारी विजय लामकाने, नगराध्यक्षा अनुसया राठोड, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मिलिंद साटोणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सोळंखे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अशोक जाधव, सावंगी रुग्णालयाचे डॉ. अभिषेक जोशी, डॉ. शिंगणे, डॉ. राजेश गडारिया, महामंत्री गोविंद टोकरे, राजेश राठोड, अंबादास कंचकटले, राजेश हरी राठोड, माधव कुळसंगे, पुष्पा सोयाम, उर्मीला बेल्लाळे, आनंद कदम, सुनील मडावी, सुदाम राठोड, दिगांबर आंबटवार, गोपीनाथ चव्हाण, सुनील जाधव, श्रीदास राठोड, माधव नेवळे, संभाजी रायवाड, वामन तुराणकर, साहेबराव राठोड, गोवर्धन चव्हाण, सिताराम राठोड, टिकाराम राठोड, जेठालाल चव्हाण, शामराव गेडाम, विष्णू गुरमे, विलास पवार, भिकू राठोड, मनोहर कन्नाके, शिवाजी भोईनवाड, नामदेव सलगर, उत्तम पवार, राहुल राठोड, उल्हास जाधव, उखंडराव चव्हाण, चव्हाण, प्रवीण राठोड, प्रेमदास राठोड, शरद चव्हाण, राजू बेल्लाळे, अजय खंदारे, रामेश्वर सबूचे, रमाकांत जंगापले, भानुदास जाधव, नारायण वाघमारे, केशव चव्हाण, कपिल राठोड, बालाजी माने, कृष्णा चव्हाण, जानकर सुनिता नामवाड, पुष्पा सोयाम, उर्मिला बेल्लाळे, अश्विनी गुरमे, वर्षा गुरमे, सत्यशीला चव्हाण, सुधा कन्नाके, चांदबी शेख, विजया चव्हाण यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.