Home Breaking News शासनाच्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे प्रथम उद्दिष्ट अशोक वुईके; कोरपना येथे...

शासनाच्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे प्रथम उद्दिष्ट अशोक वुईके; कोरपना येथे छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर

18

• शासनाच्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे प्रथम उद्दिष्ट अशोक वुईके

• कोरपना येथे छत्रपती शिवाजी

महाराज महा राजस्व समाधान शिबिर

कोरपना : शासनाच्या विविध योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचाव्यात, या उद्दिष्टाने प्रशासन कार्यरत असून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनांचा लाभ मिळावा, यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक वुईके यांनी केले.

कोरपना उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते.

यावेळी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे, नगराध्यक्ष नंदाताई बावणे, नगरसेवक किशोर बावणे , गीता डोहे, वर्षा लांडगे ,सविता तुमराम ,चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,जिल्हा स्तरावरील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी,
राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, कोरपना उपविभागीय अधिकारी बालाजी कदम, तहसीलदार करिष्मा वासेकर, गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, विविध विभागाचे तालुका स्तरीय अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांनी आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल उभारले होते. तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांअंतर्गत साहित्य व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.