Home Breaking News राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठी बळकटी; मोहब्बत खान यांच्याकडे अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्षपदाची...

राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठी बळकटी; मोहब्बत खान यांच्याकडे अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्षपदाची धुरा

4
Oplus_131072

राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठी बळकटी; मोहब्बत खान यांच्याकडे अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्षपदाची धुरा

सुवर्ण भारत | मोबीन बेग
कोरपना प्रतिनिधी

कोरपना : राजुरा विधानसभा मतदारसंघातील

 

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला आणखी बळ मिळाले असून, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले मोहब्बत खान यांनी आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार भोंगळे यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा परिधान करून त्यांचे पक्षात उत्साहात स्वागत करण्यात आले.

पक्षप्रवेशानंतर मोहब्बत खान यांच्यावर भाजप कोरपना शहर कार्यकारिणीच्या अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पक्षाच्या वतीने त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटन कौशल्य, समाजातील सक्रिय सहभाग आणि पक्षाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन त्यांची ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोहब्बत खान यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आमदार देवराव दादा भोंगळे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवत संघटना अधिक सक्षम करण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले.

नियुक्तीनंतर मोहब्बत खान यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अल्पसंख्यांक समाजात भारतीय जनता पक्षाची विचारधारा प्रभावीपणे पोहोचविणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीमुळे कोरपना शहरातील भाजपच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा व गती मिळणार असून, आगामी स्थानिक राजकारणात पक्षाची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.