Home Breaking News • “हरीच्या काला गोड झाला” च्या नामात दंग झाले घुग्घुसकर •आमदार...

• “हरीच्या काला गोड झाला” च्या नामात दंग झाले घुग्घुसकर •आमदार जोरगेवारांच्या मार्गदर्शनात महाप्रसाद, दूरध्वनीवरून दिल्या शुभेच्छा

31
Oplus_131072

• “हरीच्या काला गोड झाला” च्या नामात दंग झाले घुग्घुसकर

• आमदार जोरगेवारांच्या मार्गदर्शनात महाप्रसाद, दूरध्वनीवरून दिल्या शुभेच्छा

घुग्घुस, 30 जुलै: गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर घुग्घुस प्रभाग क्रमांक 5 येथील संत श्री साईबाबा बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने भक्ती, भजन आणि महाप्रसादाचा भव्य सोहळा संपन्न झाला. “हरीच्या काला गोड झाला, ज्याच्या मुखी त्याला मिळाला” या नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या मंडळाला यंदा 5 वर्षे पूर्ण होत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.

प्राणप्रतिष्ठेने झाला शुभारंभ
कार्यक्रमाची सुरुवात संत श्री. साईबाबांच्या प्रतिमेच्या प्राणप्रतिष्ठेने झाली. ही प्राणप्रतिष्ठा गणेश शेंडे,सौ. रुपाली गणेश शेंडे,सचिन बोंडे, सौ.वैशालीताई बोंडे यांच्या हस्ते करण्यात आली. घुग्घुस शिवा महाराज कोहडे यांच्या वैदिक मंत्रोच्चारात विधिवत पूजन करून साईबाबांना नैवेद्य अर्पण करण्यात आला.

महिला मंडळाच्या भजनाने रंगला परिसर
सकाळी ११ वाजता महिला मंडळ घुग्घुस यांच्याकडून सुंदर भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. साईबाबांच्या विविध भक्तीगीतांवर भाविक तल्लीन झाले. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी भजनाचा आनंद लुटला.

महाप्रसादात हजारोंचा जनसागर
सायंकाळी आयोजित भव्य महाप्रसादाला हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. सर्व समाज एकत्र येऊन पंगतीत बसून प्रसाद घेतल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मंडळाचे उद्दिष्ट असलेली “सर्व समाज एकत्र येऊन प्रभूचे गुणगान गावे” ही भावना यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

आमदार जोरगेवारांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम
या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. विशेष कामानिमित्त ते स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी दूरध्वनीवरून मंडळाला शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाला पवन आगदारी,सौ. रंजिता आगदारी,रोशन पचारे, पूजा दुर्गम,संजय तिवारी, स्वप्निल वाढई, मंगेश कामतवार, महेश पचारे,बालू चिकनकर,चांदेकर, सुरेश पाटील बोबडे, संजय भोंगळे यांच्यासह विविध सामाजिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष गणेश शेंडे, उपाध्यक्ष गणेश वझे, अध्यक्ष शंकर कामतवार,सचिव पंकज बावणे, सहसचिव श्रीकांत पतरगे, संघटक सचिन बोंडे यांनी नियोजन केले.

मंगेश टेकाम,मांढरे, निशांत, विशाल टेकाम,मंगेश एका, राजन दाभेकर, अनिल कामतवार, अण्णा, अरविंद पठाडे, शाईन शेख, अमोल मांढरे, रुपेश कोरे यांच्यासह महिला भगिनी व युवा कार्यकर्त्यांनी दिवसभर परिश्रम घेऊन कार्यक्रम शांततेत पार पाडला.

भक्तीभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.