Home Breaking News आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपुरात विदर्भस्तरीय भव्य मॅरेथॉन मुसळधार पावसातही...

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपुरात विदर्भस्तरीय भव्य मॅरेथॉन मुसळधार पावसातही सुमारे ९८० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

25
Oplus_131072

• आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपुरात विदर्भस्तरीय भव्य मॅरेथॉन

मुसळधार पावसातही सुमारे ९८० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर येथे विदर्भस्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दादाभाई नौरोजी काटा परिसरातून सुरू झालेल्या या स्पर्धेला मुसळधार पावसाचाही अडथळा ठरला नाही. विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे ९८० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

पुरुष, महिला, युवा तसेच ज्येष्ठ नागरिक अशा विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. प्रतिकूल हवामान असूनही स्पर्धकांनी जिद्द, चिकाटी आणि क्रीडाभावनेचे दर्शन घडवत शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण केली. उपस्थित नागरिकांनीही टाळ्यांच्या गजरात स्पर्धकांचे उत्साहवर्धन केले.

स्पर्धेतील सहभाग :
पुरुष खुला गट – ३५० स्पर्धक, महिला खुला गट – २८० स्पर्धक, १० ते १८ वर्षांखालील मुला-मुलींचा गट – ३०० स्पर्धक, सीनियर सिटीजन गट – ५० स्पर्धक.

विजेते पुढीलप्रमाणे :

पुरुष खुला गट :
प्रथम – राजेश यादव, द्वितीय – शुभम तिवारी, तृतीय – संतोष कुमार.

महिला खुला गट :
प्रथम – मिताली भोयर, द्वितीय – प्रणाली शेडकेवार, तृतीय – रुक्मिणी.

१६ वर्षांवरील मुलांचा गट :
प्रथम – निखिल अजिंक्यवार, द्वितीय – ओम निलमिले, तृतीय – पियुष पटले.

१६ वर्षांवरील मुलींचा गट :
प्रथम – रुचिता नागरकर, द्वितीय – अनन्या नागरकर, तृतीय – रुक्मिणी सलामे.

३० वर्षांवरील पुरुष गट :
प्रथम – अमोल चाचणी, द्वितीय – उमेश डोंगरे, तृतीय – नितीन लोनगाडगे.

३० वर्षांवरील महिला गट :
प्रथम – पल्लवी मेश्राम, द्वितीय – शुभांगी राऊत, तृतीय – अखिल फटिंग.

कार्यक्रमाला वरिष्ठ पत्रकार समीर केने, माजी नगरसेवक अरुण वाघमारे, पत्रकार नारद प्रसाद, शंकर महाकाली, अविनाश टोंगे, योगेश मडावी आणि सुनील दंडे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.

या भव्य मॅरेथॉनचे आयोजन सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांनी केले. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन सुनील यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फॅन्स क्लबचे सचिव शशिकांत मुंडे यांच्यासह सुनील यादव, आकाश चौधरी, सुधाकर सिक्का, कमल वर्मा, विनोद कोवे, मनोज धामणगे, मिलाप, रमेश बानोत, आदर्श पोतलावार, शुभम जंगम, मंजित तसेच क्लबचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुसळधार पावसातही अथक परिश्रम घेत मोलाचे योगदान दिले.