भाजपचे युवा नेते सुदाम राठोड यांनी घेतली जिवती येथील शेतकऱ्याची भेट; ऑफलाईन सात-बारावरून ‘फार्मर आयडी’ सुरू करण्याचे तहसीलदार यांना केली विनंती
प्रतिनिधी -कृष्णाजी चव्हाण.
जिवती -: राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष सूचनेनुसार, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सुदाम राठोड यांनी जिवती तालुक्यातील प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या दरम्यान शेतकऱ्यांना येत असलेल्या विविध तांत्रिक अडचणींवर तातडीने तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रशासनाला विंनती केली महत्त्वाच्या सूचना दिल्या.शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले लक्ष सध्या शेतीशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ऑनलाईन प्रणालीतील विविध त्रुटी आणि सर्व्हर डाऊन असण्याच्या समस्येमुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.जिवती तालुक्यातील 80 टक्के शेतकऱ्यांकडे ऑफलाईन सातबारे आहेत अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रियेत नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तहसीलदारांना विंनती केली व
शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत युवा नेते सुदामभाऊ राठोड यांनी थेट तहसीलदार कार्यालयाची भेट घेतली. शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी ‘ऑफलाईन सात-बारा (7/12) उतारा ग्राह्य धरून तात्काळ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी सुरू करण्यात यावेत’,अशी विंनती केली आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिवती तालुक्यातील एकही शेतकरी शासकीय योजनांपासून किंवा फार्मर आयडीपासून वंचित राहणार नाही. या साठी कर्तव्यदक्ष आमदार देवराव भोंगळे साहेब यांच्या सोबत फोन वर वार्तालाप झाली आमदार साहेबांनी लवकरच यावर तोडगा काढू असे आश्वस्त केले.यावेळी युवा नेते सुदाम राठोड त्यांच्यासोबत स्थानिक शेतकरी, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदामभाऊ राठोड यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे जिवती तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.







