बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरीविरोधात मनसेचे निवेदन; तात्काळ कारवाईची मागणी
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : बल्लारशा शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरीच्या दुकानांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्षा कल्पना पोतर्लावार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक, बल्लारशाह पोलीस ठाणे यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑनलाइन लॉटरीच्या व्यवसायामुळे युवक, कष्टकरी तसेच सर्वसामान्य नागरिक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला. या व्यवसायामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवत असून सामाजिक समस्याही वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर संबंधित बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी केंद्रांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मनसेचे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांडे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, शहराध्यक्ष पियुष धुपे, वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नवाब शेख, तसेच मनसैनिक शालू जोगे, जयश्री जोगे, शिखा दास आणि शशिकला जोगे उपस्थित होते.







