विसापूर टोल प्लाझातर्फे विधानपरिषद आमदार अरूण लाखनी यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धांना भोजनदान
सुवर्ण भारत : वैभव मेश्राम
प्रतिनिधी, बल्लारपूर
विसापूर:-चंद्रपूर–वर्धा–गडचिरोली विधानपरिषदचे आमदार तथा विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे संस्थापक अरुण लखानी यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ७० ते ८० ज्येष्ठ नागरिकांसोबत भोजनादान व तसेच केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
दिलीप कंचर्लावार व्यवस्थापक, विसापूर टोल नाका,जयपाल मरापे, रामेश्वर खडातकर, गजानन चरपे,सचिन नागपुरे, सुधीर मुत्तेलवार, रितेश सिंग, सिवा राव, मुरली राय, नरेश नाम्मिला, प्रकाश गजपुरे, मयूर चौधरी, सचिन पीदुरकर, सुशील वर्मा आणि नितीन राऊत यांनी विशेष सहकार्य केले.







