Home Breaking News घुग्घूस पोलिसांचा गांजा तस्करीवर सर्जिकल स्ट्राइक : १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, मोपेडस्वार...

घुग्घूस पोलिसांचा गांजा तस्करीवर सर्जिकल स्ट्राइक : १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, मोपेडस्वार अल्पवयीन तस्कर जाळ्यात

10

घुग्घूस पोलिसांचा गांजा तस्करीवर सर्जिकल स्ट्राइक : १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, मोपेडस्वार अल्पवयीन तस्कर जाळ्यात

घुग्घूस, दि. २७ – चंद्रपूर ते घुग्घूस मार्गावर गांजा तस्करी करणाऱ्यांवर घुग्घूस पोलिसांनी सर्जिकल स्ट्राइक केला आहे. पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून १.८३० किलो गांजाची वाहतूक करणाऱ्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकावर पोलिसांनी धडक कारवाई करीत तब्बल १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

*पोलिसांचा सापळा -*
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी एक इसम सुझुकी ॲक्सेस मोपेडवरून गांजा घेऊन चंद्रपूरकडून घुग्घूसकडे येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी शेणगाव फाट्यापासून ४ किमी पूर्वेकडे सापळा रचला.

सकाळी १०.२६ ते दुपारी १.५० वाजताच्या दरम्यान संशयित मोपेड येताच पोलिसांनी त्याला अडवून पंचांसमक्ष झडती घेतली. झडतीत मोपेडवर १.८३० किलो प्रतिबंधित गांजा आढळला. पोलिसांनी तात्काळ गांजा व मोपेड ताब्यात घेतली.

*जप्त मुद्देमाल -*
१) १.८३० किलो गांजा – किंमत ९१,५०० रु.
२) सुझुकी ॲक्सेस मोपेड – किंमत ४०,००० रु.
*एकूण मुद्देमाल – १,३१,५०० रुपये*

या प्रकरणी घुग्घूस पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २७३/२०२६ अन्वये NDPS कायदा कलम २०(ब), ८(क), २९, ४३ व बाल न्याय अधिनियम कलम ७७, ७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलांना पुढे करून गांजा तस्करी करणारी मोठी टोळी सक्रिय आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

*ही कारवाई* पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड, PSI रवींद्र वाघ, HC अनिल बैठा, विशाल हूड, राकेश तुराणकर, PC महेश भोयर, प्रसन्ना डोरलीकर, पवन डाखरे, रवींद्र शेंडे यांच्या पथकाने केली.