“आमचं कुलदैवतच आमच्या घुग्घुसचं रक्षण करतंय; रक्षाबंधनला बहिरम बाबाच्या चरणी नतमस्तक होणारच!” – घुग्घुसकरांची भावना
घुग्घुस (प्रतिनिधी) -“घुग्घुस म्हणजे काय? तर बहिरम बाबा आणि बहिरम बाबा म्हणजेच घुग्घुस!” अशी भावना आज प्रत्येक घुग्घुसकराच्या मनात आहे. आमच्या सुख-दुःखात, आमच्या प्रत्येक अडचणीत आमच्या पाठीशी उभा राहणारा आमचा कुलदैवत श्री बहिरम बाबा आहे, अशी भावना व्यक्त करत घुग्घुसकर आता रक्षाबंधनच्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी *श्री बहिरम बाबा तीर्थक्षेत्र विकास संस्था, घुग्घुस* आणि *माँ शक्ति माँ दुर्गा मंडळ* यांनी *28 ऑगस्ट 2026 रोजी नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन)* निमित्त भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या बातमीने संपूर्ण घुग्घुस नगरीत भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
*नागरिक काय म्हणतात?*
यावेळी बोलताना स्थानिक नागरिक म्हणाले, “आम्ही कुठेही गेलो तरी आमचे बहिरम बाबा आमचे रक्षण करतात. रक्षाबंधन हा फक्त सण नाही, तर आमच्या बापाला राखी बांधण्याचा दिवस आहे. आम्ही सर्व कुटुंबासह या शोभायात्रेत सहभागी होणार आहोत.”
दुसरे नागरिक म्हणाले, “बाबाच्या शोभायात्रेत जेव्हा आम्ही चालतो तेव्हा आम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. हा आमचा अभिमान आहे.”
*28 ऑगस्ट रोजी प्रभाग क्र. 2, 2 नंबर रोड, श्री बहिरम बाबा देवस्थान येथे* होणाऱ्या या सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे.
– सकाळी 8 वाजता आरतीने दिवसाची सुरुवात होईल,
– 10 वाजता नगरी भ्रमण करणारी भव्य शोभायात्रा निघेल,
– दुपारी 12 वाजता सर्वांसाठी महाप्रसाद असेल आणि
– दुपारी 2 वाजता महाआरती होईल.
हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर घुग्घुसच्या एकतेचं आणि श्रद्धेचं प्रतिक आहे. तरी सर्व घुग्घुस वासियांनी या भक्ती सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
*आयोजक :-* माँ शक्ति माँ दुर्गा मंडळ, बहिरम बाबा पदावली भजन मंडळ, सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ, युवा बजरंग व क्रिडा मंडळ तथा शिवजयंती उत्सव समिती, घुग्घुस.








