Home Breaking News • घुग्घुसात मातीशी नाळ जोडणारा तान्हा पोळा ; मोबाईल विसरून चिमुकले झाले...

• घुग्घुसात मातीशी नाळ जोडणारा तान्हा पोळा ; मोबाईल विसरून चिमुकले झाले सर्जा-राजाचे सारथी • २१७ वर्षांची विदर्भाची परंपरा जपली; सर्वधर्मीय समभाव समाजाच्या नंदीबैल सजावट स्पर्धेने जिंकली मने

2
Oplus_131072

• घुग्घुसात मातीशी नाळ जोडणारा तान्हा पोळा ; मोबाईल विसरून चिमुकले झाले सर्जा-राजाचे सारथी

• २१७ वर्षांची विदर्भाची परंपरा जपली; सर्वधर्मीय समभाव समाजाच्या नंदीबैल सजावट स्पर्धेने जिंकली मने

घुग्घुस, ता. १२ -जिथे आजकाल लहान मुले मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवली आहेत, तिथेच घुग्घुस शहराने काल एक वेगळेच चित्र दाखवले. बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पारंपारिक तान्हा पोळ्याचा उत्सव शहरात मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा झाला.

पहाटेपासूनच गल्ली-बोळातून “बोला बोझारा…” ची निरागस हाक ऐकू येत होती. हातात रंगीबेरंगी झूल, बाशिंग, घुंगरू आणि झेंडूच्या फुलांनी सजवलेले लाकडी नंदीबैल घेऊन बालगोपाळ चौकात जमा झाले होते. कोणाचा सर्जा लाल झूलीत, तर कोणाचा राजा मोरपिसात सजला होता. हा फक्त खेळ नव्हता, तर शेतकरी आणि बैलाच्या नात्यातील कृतज्ञतेचा संस्कार होता.

*एकतेचे दर्शन*
यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती सर्वधर्मीय समभाव समाजाने आयोजित केलेली भव्य नंदीबैल सजावट स्पर्धा आणि मिरवणूक. या मिरवणुकीत हिंदू, मुस्लिम, सर्व जाती-धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन गांधी चौकात कार्यक्रम बघण्यासाठी मोठा सहभाग घेतला. खऱ्या अर्थाने घुग्घुसने एकतेचे दर्शन घडवले. बघ्यांची गर्दी मनमोहक होती.

आयोजक म्हणाले, “या मोबाईलच्या युगात मुलांना पुन्हा मातीशी, शेतीशी जोडणे गरजेचे आहे. तान्हा पोळा हा फक्त सण नाही, तर पुढच्या पिढीवर संस्कार करण्याची शाळा आहे.”

स्पर्धेत आकर्षक सजावट, सर्वोत्तम वेशभूषा आणि सामाजिक संदेश अशा गटात बक्षिसे देण्यात आली. सहभागी प्रत्येक चिमुकल्याला प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पालक आणि शहरवासीय उपस्थित होते.

लाकडी बैलांच्या टुणटुण आवाजात घुग्घुस शहराने आपली परंपरा पुन्हा एकदा जिवंत ठेवल्याचा अनुभव काल सर्वांनी घेतला.